Rating:
0
हे जग गंभीरपणे घेऊ नका! - भाग १

हे जग गंभीरपणे घेऊ नका! - भाग १

आध्यात्मिक संकल्पना

by किशोर कुलकर्णी (write a review)
Type: Print Book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: Rs.313.00 + shipping
Preview
Price: Rs.313.00 + shipping

Processed in 3-5 business days. Shipping Time Extra
Description of "हे जग गंभीरपणे घेऊ नका! - भाग १"

मी एक सर्वसाधारण मुमुक्षु आहे आणि माझे अध्यात्माचे आकलन इतरांपर्यंत पोहचवावे या उद्देशाने मी हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे ठरविले. हे पुस्तक माझ्या ब्लॉग्जवर आणि माझ्या लेखांवर आधारित असून ते दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात आध्यात्मिक संकल्पना आहेत, तर दुसर्याित आध्यात्मिक ध्येय काय असावे आणि ते प्राप्त करण्यासाठी काय करावे यासंबंधातील माझे विचार मांडलेले आहेत. मी या पुस्तकात आध्यात्मिक ग्रंथांमधून थेट कांहीही उद्धृत करणे शक्यतोवर टाळले आहे आणि त्याऐवजी मला त्यातून काय कळले, ते साराच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात मी कांही तरी "सिद्ध करण्यासाठी" दुसरे कांही तरी क्लिष्ट तत्त्व मांडणे वगैरे कांही केलेले नाही. त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय व उपयुक्त देखील व्हावे असा मला विश्वास आहे.

शक्यतोवर माझे विचार मी व्यावहारिक जीवनाच्या संदर्भात मांडले आहेत. मी या पुस्तकात कित्येक गोष्टी आणि संवाद यांचा अंतर्भाव केला आहे. जरी ते काल्पनिक असले, तरी त्यातून आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते असा माझा विश्वास आहे. तसेच त्यामुळे पुस्तक वाचनीय होण्यास देखील मदत होते, कारण अन्यथा अध्यात्मासारखा विषय खूपच बोजड आणि नीरस वाटू शकतो.

माझा असा विश्वास आहे की हे पुस्तक सोप्या भाषेत आणि माझ्यासारख्या एका सर्वसाधारण साधकाने लिहिलेले असल्यामुळे ते अध्यात्ममार्गात नुकताच रस निर्माण झालेल्या कोणाही साधकाला सहजपणे वाचता येईल व समजेल. अध्यात्ममार्गावर प्रगति झालेल्या मुमुक्षूंना सुद्धा या पुस्तकाचा उपयोग मनन व चिंतनासाठी होऊ शकेल, कारण अध्यात्म म्हणजे या ऐहिक जगाच्या पलिकडे काय आहे याचा सातत्याने विचार करत राहून मनाचे संपूर्ण परिवर्तन घडवून आणणे होय.

About the author(s)

लेखक एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात एका छोट्या शहरात जन्मला व वाढला. परंपरागत रूढी व धर्माचरण यानुसार जीवन जगणारे कुटुंब व त्यामुळे एक प्रकारे देवभीरु स्वभाव नैसर्गिकपणॆच बनलेला. पण पुढे अभियांत्रिकी पदवीसाठी मुंबईतील एक प्रथितयश संस्थेत पांच वर्षे वसतिगृहात राहाणे व नंतर नोकरीनिमित्त निरनिराळ्या शहरात व अठरापगड जातीधर्मांच्या व पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये वावरल्यामुळे व्यक्तिमत्त्वात बदल होत गेला. पूर्वीचा धार्मिक व देवभीरु स्वभाव कमी होऊन, अधिकाधिक शास्त्रीय व तार्किक दृष्टिकोण बनला.

पुढे एकदा सिंगापूरमध्ये कामनिमित्त तीन महिने वास्तव्य करावे लागले. लेखकचा भाऊ तिथेच स्थायिक असल्याने त्याच्या घरीच राहणॆ झाले. त्यादरम्यान भावाच्या गुरूंची योगायोगाने भेट घडून आली आणि तेव्हांपासून अध्यात्मात रस वाढू लागला. मग नोकरी लवकरच, म्हणाजे वयाच्या ५३ व्या वर्षीच सोडून अध्यात्माची कास धरली. ज्ञानेश्वरीचे अनेकवार वाचन व मनन झाले. ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर करून ते ब्लॉगच्या स्वरूपात "स्पीकिंग ट्री" या टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर पोस्ट केले. तसेच त्याच साइटवर इतर आध्यात्मिक चिंतनाच्या स्वरूपातील कित्येक ब्लॉग पण पोस्ट केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या दैनिकात संपादकीय पानावर "स्पीकिंग ट्री" नांवाच्या आध्यात्मिक कॉलममध्ये वीसच्या वर लेख सुद्धा छापून आले. मग लेखकाने त्याच्या आध्यात्मिक चिंतनाच्या ब्लॉगचे पुस्तकरूपाने स्वप्रकाशन केले. तसेच ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर सुद्धा स्वप्रकाशित केले. गीतेचे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे मनन चिंतन झाले, त्या आधारावर लेखकाला समजलेले गीतेचे सार प्रथम इंग्रजीतून स्वप्रकाशित केले. त्यानंतर त्याचेच मराठी प्रकाशन हे प्रस्तुतचे पुस्तक.

लेखकाला त्याच्या सद्गुरूंकडून रीतसर शक्तिपाताची दीक्षा लाभलेली आहे आणि सद्गुरु कृपेनेचे अध्यात्ममार्गावर वाटचाल सुरु आहे.

Book Details
Number of Pages: 
267
Dimensions: 
6 inch x 9 inch
Interior Pages: Black & White
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)
Other Books in Religion & Spirituality
TATTVABODHA
TATTVABODHA
by V. RAVI
Reviews of "हे जग गंभीरपणे घेऊ नका! - भाग १"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.