Rating:
4.75
Yin-Yang (eBook)

Yin-Yang (eBook)

गूढ आणि विज्ञान यांच्या संधिप्रकाशात घडणार्‍या गोष्टी

by Suneel Sule (4 reviews, add another)
Type: e-book
Genre: Literature & Fiction
Language: Marathi
Price: Rs.60.00
Available Formats: PDF Immediate Download on Full Payment
Preview
Description of "Yin-Yang (eBook)"

A collection of 14 Marathi short stories set in the twilight zone between Science and the unknown.
चीनी तत्त्वज्ञानात यिन-यांग ही संकल्पना स्त्री-पुरुष, रात्र-दिवस, पाणी-आग, ओहोटी-भरती अशा वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या, पण वास्तुतः एकमेकांना पूरक असलेल्या शक्तींचे प्रतीक आहे. त्या शक्ती परस्परविरोधी नसून परस्परावलंबी आहेत. विज्ञान आणि गूढवाद अशाच परस्परावलंबी शक्ती नाहीत का? मनाला थक्क करून टाकणार्या काही घटनांचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकेल तर काही गूढाच्या अख्त्यारीतल्या असतील. ’यिन-यॅंग’ हा अशाच गूढ आणि विज्ञान यांच्यामधल्या संधिप्रकाशात घडलेल्या कथांचा संग्रह आहे.

About the author(s)

कॅप्टन सुनील सुळे यांनी आपल्या आयुष्याची २५ वर्षे समुद्रावर प्रवास केला. या काळात त्यांनी ६५ देशांना भेटी दिल्या; तिथल्या लोकांच्या चालण्या-बोलण्याच्या सवयी, राहणीमान, आवडी-निवडी यांची झलक त्यांना पाहायला मिळाली. त्यांच्या गोष्टीमध्ये ठिकठीकाणी हे संदर्भ बघायला मिळतील.

२५ वर्षांच्या समुद्र सेवे नंतर उच्च शिक्षण घेउन त्यांनी मुंबईच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. हल्ली ते अँगलो इस्टर्न मॅरिटाइम ट्रेनिंग सेंटर या संस्थे मध्ये जहाजाच्या नॅव्हिगेटिंग ऑफिसर्स व मरीन एंजीनिअर्सना प्रशिक्षण देतात.

मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये लेखन करण्याशिवाय त्यांना फोटोग्राफी आणि चित्रकलेचाही छंद आहे. त्यांच्या इमेजेस ऑफ चायना" छायाचित्रांची महाराष्ट्रात पाच ठिकाणी प्रदर्शने झाली.

Book Details
Publisher: 
Spring Rose Publications
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Literature & Fiction
FRAILTY
FRAILTY
by SARDAR PARAMJIT SINGH
Atiranjit
Atiranjit
by Abhinav Suryawanshi
The One Who Stood By My Side
The One Who Stood By My Side
by Vedant Bhrambhatt
Marrying A Manglik
Marrying A Manglik
by Nimai Joshi
Reviews of "Yin-Yang (eBook)"
Write another review

Comments

Re: Yin-Yang (e-book) by Leena Sohoni
10 February 2014 - 11:13am

लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर गूढ आणि विज्ञान यांच्या संधीप्रकाशात घडणाऱ्या या कथा आहेत. चीनी तत्वज्ञानानुसार यीन आणि यांग या संकल्पनांमधून वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या शक्ती प्रत्यक्षात एकमेकींशी एका सूत्राने कशा गुंफलेल्या असतात, या सगळ्या सृष्टीचा समन्वय आणि समतोल साधण्यासाठी त्या कशा अत्यावश्यक असतात, एकीतून च दुसरी कशी जन्म घेते हे स्पष्ट केलेलं आहे. लेखकाच्या कथेतही शक्य आणि अशक्य, तर्क्य आणि अतर्क्य, वास्तव आणि गूढ , सैन्द्रिय आणि अतीन्द्रिय यांचा असाच अत्यावश्यक मिलाफ पाहायला मिलतो. मुखपृष्ठावरील कृष्ण धवल रेखा कृती मधून सुद्धा परस्पर विरोधा मधील या एकात्मतेच दर्शन घडतं . या पुस्तकातील कथे विषयी बोलायचं झालं , तर खरोखर तिन्हीसांजेच्या शांत वेळी फेरफटका मारायला एकटच बाहेर पडाव, बघता बघता पाय अनोळखी रस्त्याकडे वळावे आणि अचानक विजेचा कल्लोळा प्रमाणे सरसरून कसल्यतरी प्रकाशानं आसमंत उजळून निघावा , तसं बेमालूमपणे एक अतर्क्य गूढ समोर उभं ठाकतं. ते आपल्याला नजरेआड करता सुद्धा येत नाही. असा अंधार उजेडाचा संगम तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात कधी न कधी घडलेला च असतो. कुणाचाही विश्वास बसणार नाही असे, शब्दात न मांडता येणारे अनुभव आपणा सर्वाना आलेले असतात. स्वतः ला तर्का चा मेरुमणी मानणाऱ्या आपल्या एखाद्या मित्रांला देखील एकदा न एकदा तरी इतक्या अशक्य गोष्टीला सामोरं जावं लागतं , की तो सुद्धा हात टेकतो .

यीन यंग पुस्तकातील प्रत्येक कथा अशीच सध्या सुध्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर बेतलेली आहे. यातली माणसं , त्यांची भाषा, बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धती , त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या भाव भावना , हे सगळं काही तुमच्या आमच्या सारखच असतं. पण त्याचं ते सरळ साध आयुष्य जगत असताना अचानक ती माणसं एका अद्भुत , गूढ , अतर्क्य अनुभवाला सामोरं जातात. हा अतीन्द्रीय अनुभव कधीतरी कथेतील रहस्याची उलगड करण्यासाठी लेखक वापरतो, तर कधी वाचकालाच एक प्रश्न कथे च्या शेवटी टाकून त्याची मती कुंठीत करून टाकतो . कॅप्टन सुळे यांची शब्दावरची पकड फार सुरेख आहे, भाषा खिळवून टाकणारी आहे.शैली सहजसुंदर पण उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक कथेची मांडणी नेटकी असून पाल्हाळ कुठेच नाही. कथेच्या ओघात येणारे संवाद नैसर्गिक वाटतात. हे पुस्तक वाचकान आवडेल यात शंका नाही

Re: Yin-Yang (e-book) by meghashri_dalvi
3 January 2014 - 10:58am

"ब्लॅक अँड व्हाइट" म्हणजे अत्यंत वेगळ्या विषयावर अत्यंत हुशारीने लिहिलेली एक अप्रतिम कथा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या विज्ञानाकडे/तंत्रज्ञानाकडे कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं. पण त्यातले बारकावे शोधून त्यावर एक सुरेख कथा लिहिल्याबद्दल कॅ. सुनील सुळे यांचं मन:पूर्वक अभिनंदन!

या संग्रहातली प्रत्येक कथा अशी वेगवेगळ्या अनोख्या विषयांवर आहे. आणि त्या विषयांवर मोजक्याच शब्दात एक संपूर्ण कथा उभी करण्यात सुळे यांचा हातखंडा दिसून येतो.

"पोकळी" या कथेतला विषयही असाच - एकदम आगळा. ही मला संग्रहातली सर्वात आवडलेली कथा.

कॅ. सुनील सुळे - तुमच्या पुढच्या संग्रहाची वाट पहात आहे.

Re: Yin-Yang (e-book) by potnissmita7
26 November 2013 - 3:08pm

यिन यांग मधील कथासंग्रह म्हणजे चढती भाजणी आहे. एक कथा वाचली. ती आवडली. दुसरी कथा त्याहून आवडते आणि त्यानंतर एकही कथेत हा क्रम चुकत नाही. कथा अधिकाधिक आवडतच जातात. पण, म्हणून उलट्या क्रमाने वाचायला गेल तरी माणूस फसेल कारण तिथेही चढती भाजणीच आहे. उतरती भाजणी होतंच नाही. यातल्या कथा किती ही वेळा वाचल्या तरी तोच आनंद देतात. कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात हे आणखी एक वैशिष्ट्य ! सगळ्याच कथा अत्यंत उत्तम आहेत. अफाट लिखाण !

स्मिता पोतनीस

Re: Yin-Yang (e-book) by atul sule
15 November 2013 - 12:04pm

There was a mad scramble to read the book but Amita was first to finish! she liked each & every story & especially liked the unexpected yet pleasant twist at the end of each story.the story of Aesop depicts an artificially intelligent chip being more human than human beings.she immensely liked 'Pardafash",'cyclepatu' and 'Tejomegh Bernard' based on a true story.These stories have a unique blend of story writing skills of Jules Verne,H G Wells,R L Stevenson,Agatha Christy and O Henry! Who knows ten years down the line the scientific concepts mentioned in these science fictions may come into reality!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.