You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
जुन्या आणि नव्या काळाच्या मध्यावरील प्रत्येक पिढीला संघर्षाला सामोरं जावंच लागतं. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत जातात. प्रत्येकाला हा बदल स्वीकारूनच या संघर्षातून मार्ग काढायचा असतो. कोणाच्याही श्रद्धेला तडा जाऊ न देता दोन पिढ्यांतील समन्वय माणसाचं जगणं सुकर करतो, मग जुन्या-नव्याच्या आठवणी सोबत घेऊन माणसाचा आयुष्याचा प्रवास सुरू राहतो.
'यादगार' या कथासंग्रहातील पात्रांचा प्रवास असाच संघर्षाला सामोरे जात सुरू असताना दिसतो. 'संकष्टी चतुर्थी' या कथेतील नायकाच्या आई-वडिलांची श्रद्धा आणि त्याचा व्यवहारी जमाखर्च ही दोन पिढ्यांतील समन्वय साधणारी मानसिकता एकीकडे सुखद वाटते, तर 'व्रूम$$ व्रूम$$' या कथेतील आधुनिक युगातील वेगाचे परिणाम अस्वस्थ करतात. 'अब तो होश ना खबर है' या कथेतील नायक मानवी इच्छा, वासना आणि मोहात अडकणाऱ्या माणसाला आताच्या आंतरजाल युगातील धोके सांगत सावध करतो. आणि 'श्रम साफल्य' ही कथाही मानवी व्यवहारात भावभावनांचं महत्त्व अधोरेखित करत माणसांच्या वृत्तीप्रवृत्तीचे दर्शन घडवते.
या संग्रहातील अशा सर्वच कथांतून संघर्ष करत जगणारा तरुण-माणूस आपल्यासमोर येतो. जगणं कुरूप बनण्याचे अनेक मोह आणि माया...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Yaadgaar.